Sunday 20 February 2022

मग कोण काम करते?

  मग कोण काम करते?

 

    ‘लोकमत’ च्या कोल्हापूर आवृत्तीचे संपादक श्री वसंत भोसले यांचा लेख “महाविद्यालयीन शिक्षणाचा बट्याबोळ’ (मंथन दि जाने 30, 2022) वाचनात आला. लेख सर्वसाधारण वाटला . तो अधिक संशोधनाचा व माहितीपूर्ण पाहिजे होता. ज्या ठळकपणे भारतीय राज्यघटनेच्या तत्वांचा उल्लेख होत तेवढ्या गंभीरपणे व निपक्षपातीपणे प्रश्नाची चर्चा लेखात झालेली  नाही. त्यामुळे अनेक प्रश्न निरुत्तरित राहतात. लेखातील अनेक वाक्य पहा उदा. “एवढा पगार प्राध्यापकास का दिला आहे?” “आयएएस झालेल्या जिल्हाधिकाऱ्यापेक्षा  अधिक पगार प्राध्यापकास आहे आणि जबाबदारी कोणतीही नाही” “तालुका पाताळीवर काम करणाऱ्या कोणाला  एवढा पगार मिळतो. तहसीलदार किवा बीडीओला तरी मिळतो का?” अशी वाक्ये वैचारिक वाटत नाहीत. भाषेचे संस्कार न झालेली वाटतात. 

मुळात लेखकाला असे वाटते कि शिक्षकास  व प्राध्यापकास शिकवण्यासाठी पगार दिला जातो. तो दूर केला पाहिजे (विनोदाने बोलायचे तर). शिक्षकास  व प्राध्यापकास शासन खालील कामासाठी पगार देते:

1. संस्था व महाविद्यालय प्रशासनच्या दबावाखाली ग्रेड मिळवण्यासाठी व टिकवण्यासाठी  NAAC ची कारकुनी कामे करने. खरी खोटी माहिती पुरवणे. खोटे रेकॉर्ड तयार करणे.

2. विद्यापीठाचे ऑडीट असो कि एमआयस कि एआयएसएचई असो खरे खोटे माहिती, रेकॉर्ड तयार करणे. माहित मिळवणे व लिहिणे यात वेळ घालवणे.

3. प्रत्येक वर्षी कोणती ना कोणती (अगदी ग्रामपंचायत ते लोकसभा) येणारी निवडणुकीचे कर्तव्य पार पाडणे. लोकशाही जिवंत ठेवने.

4. युजीसी असो किंवा रुसा या संस्थाकडून संशोधनासाठी अनुदान मिळवणे व संस्थेच्या घश्यात घालणे. त्यासाठी खोटा हिशोब देणे.

5. कोणती ना कोणती येणारी एमपीएससी ची परीक्षा असो  कि इतर वेगवेगळ्या परीक्षा असो त्या कर्तव्य म्हणून पार पाडणे.

6. लोकप्रतिनिधी (उदा. महान व आदरणीय  ग्रामपंचायत सदस्य वा नगरसेवक )  असो कि शासनाचे अधिकारी असो कि विद्यापीठाच्या समित्या, संस्थेचे पदाधिकारी कि शिक्षण विभागातील कारकून यांना साहेब साहेब म्हणणे व स्वागत  करणे. त्यांची मर्जी राखणे.

7. वर्गात शिकवण्यात नाहक वेळ घालवण्यापेक्षा महाविद्यालात कार्यक्रम घेणे, असम्बाधित उपक्रम राबवणे, वर्ग सोडून अशा कार्यक्रमास हजेरी लावणे, अभ्यासक्रमा बाहेरील उपक्रम राबवणे.

8. विद्यापीठ, शिक्षण विभाग किंवा संस्था यांच्या मंदिराच्या पायाध्याला अधीमधी माथा  लावून येणे.

9. सेमिस्टर पद्धतीत शिकवण्यात वेळ ने घालवता परीक्षा घेत रहाणे. पुन्हा परीक्षा घेणे. पुन्हा पुन्हा घेणे.

10. विध्यार्थ्यांना विध्यार्थी न मानता देव मानाने, त्यांची पूजा करणे कारण देवला शिकण्याची गरज नसते.  

11. शासनाचे वेळोवेळी येणारे वेगवेगळे गाव सर्वे प्रामाणिकपणे  राबवणे

12. शासनाचे अनेक उपक्रम उद शालेया पोषण आहार, शाळा बाह्य मुले, मतदार नोंदणी, शिष्यवृत्ती,  प्रामाणिकपणे  राबवणे.

13. स्वाभिमान व विद्वत्ता बाजूला ठेऊन निर्लज्ज होणे.

उच्च डिग्र्या प्राप्तकरून , खडतर स्पर्धा परीक्षा ( टीईटी, सेट असो व नेट) पास होऊन जेव्हा एखादा उमेदवार जेव्हा  राजकारणी चालवत असलेल्या शिक्षण संस्थाकडे (महाराष्ट्रात शिक्षण संस्था आणि राजकारणी यांचा काय संबध आहे यावर चर्चा झाली पाहिजे) नोकरी साठी जातो तेव्हा त्याला किती देणार असा एकाच प्रश्न विचारला जातो. ही वस्तुतीती कोणते प्रसार माध्यम दाखवते? यावर कोणता संपादक लिखाण करतो? आणि हि कामे शिक्षक करत नाही तर मग कोण करते?


मग कोण काम करते?

    मग कोण काम करते?        ‘लोकमत’ च्या कोल्हापूर आवृत्तीचे संपादक श्री वसंत भोसले यांचा लेख “महाविद्यालयीन शिक्षणाचा बट्याबोळ’ (मंथन दि जा...